प्रतिनिधी / कोल्हापूर
गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ वाचकांशी परखड, वस्तुनिष्ठ बातम्यांनी नाळ जोडणाऱया दैनिक `तरुण भारत’च्या कोल्हापूर आवृत्तीचा 28 वा वर्धापनदिन बुधवारी वाचक आणि हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादात व अपूर्व उत्साहात साजरा झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत दसरा चौकातील शाहू स्भारक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यामध्ये कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेले अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी `कोरोनानंतरचे जग’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. वाचकांनी मोठÎा संख्येने उपस्थित राहून `तरुण भारत’ वरील प्रेमाची प्रचिती दिली.
तरुण भारत’चा वर्धापन दिन सोहळा म्हणजे भव्यदिव्य स्नेहमेळावा असे चित्र असते. पण यंदा कोरोना संकटामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला. त्यामुळे बुधवारी सकाळी शाहू स्मारक भवन येथे नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि `तरुण भारत’चे मुख्य जाहिरात व्यवस्थापक उदय खाडीलकर, निवासी संपादक मनोज साळुंखे, जनसंपर्क अधिकारी गिरिधर शंकर, वितरण व्यवस्थापक अभिजित ब्रम्हदंडे या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
प्रारंभी `तरुण भारत’चे संस्थापक संपादक स्वर्गीय बाबुराव ठाकूर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. तरुण भारतची शतकोत्तर वाटचाल, जनसामान्यांशी असलेले नाते, आणि वाचकांच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान याबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले. तरुण भारतचे मुख्य जाहिरात व्यवस्थापक उदय खाडीलकर यांनी `तरुण भारत’च्या वाटचालीमध्ये ठाकूर घराण्यातील तीन पिढÎांनी कसे यशस्वीपणे योगदान दिले याबाबतचा लेखाजोखा मांडला. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोना महामारी काळातील प्रसार माध्यमांचे योगदान नमूद केले. तसेच कोरोना महामारीच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱयांबरोबरच सर्वसामान्य जनतेचे योगदान महत्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना यशवंतराव थोरात यांनी प्रसारमध्यमांची भूमिका, सरकारबरोबरच जाहिरातदारांचा माध्यमांवरील दबाव, प्रशासकीय अधिकाऱयांची जनसामान्यांसोबत असणारी बांधिलकी आदी बाबींचा ऊहापोह केला. तरुण भारत सोशल मिडियाच्या स्नेहा मांगूरकर व दुर्वा दळवी यांनी सुत्रसंचालन केले.
कोरोना योद्धयांचा सन्मान
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, शववाहिका चालक अमोल कांबळे, आरोग्य निरीक्षक (पंचगंगा स्मशानभूमी) अरविंद कांबळे, डॉ. अनिता सैबन्नावर (सीपीआर), बैतूलमाल संस्थेचे जाफरबाबा सय्यद, राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक भगवान गायकवाड, आशा स्वयंसेविका संगिता पिंटू पाटील (सावर्डे तर्फ असंडोली, ता. पन्हाळा), सीपीआरच्या नर्सिग इन्चार्ज सरोज पाटील, `तरुण भारत’चे पेठवडगाव वार्ताहर संतोष सणगर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, आरोग्य मित्र बंटी उर्फ विरेंद्र सावंत, रॉबिनहूड आर्मीचे सुभाष मुदंळा, पश्चिम महाराष्ट्र गोरक्षा प्रमुख संभाजी उर्फ बंडा साळोखे यांना `तरुण भारत’चे स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
विशेषांकाचे प्रकाशन
तरुण भारत वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या `कोरोनानंतरचे जग’ या विशेषांकाचे प्रकाशन करताना नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, जिल्हाधिकारी दौलत देसाई, तरुण भारतचे मुख्य जाहीरात व्यवस्थापक उदय खाडीलकर, निवासी संपादक मनोज साळुंखे, जनसंपर्क अधिकारी गिरिधर शंकर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
जिल्हाधिकाऱयांचा विशेष सत्कार
कोरोना महामारीच्या काळात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या उत्कृष्ट कामामुळेच कोल्हापूर जिह्यात कोरोना संसर्ग त्वरित आटोक्यात आला. कोल्हापूरात राबवलेली प्रत्येक मोहीम राज्यासाठी पथदर्शी ठरली. जिल्हाधिकाऱयांच्या या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
शुभेच्छांचा वर्षाव
लाखो वाचकांच्या पाठबळावर निर्भिड बाणा आणि विकासाची दृष्टी घेऊन कोल्हापुरवासियांच्या मनावर गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱया `तरुण भारत’च्या 28 व्या वर्धापनदिनानिमित्त अनेक राजकीय, शासकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती व संस्था प्रतिनिधींसह हजारो वाचक आणि हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
समाजमन जपणाऱया `तरुण भारत‘ची निर्भिड वाटचाल कायम
`तरुण भारत’चे निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी `तरुण भारत’च्या शतकोत्तर वाटचालीचा आढावा घेताना ते म्हणाले, `तरुण भारत’चे संस्थापक संपादक स्वर्गीय बाबूराव ठाकूर यांनी स्वातंत्र्यसंग्राम काळात `तरुण भारत’ची मुहूर्तमेढ रोवली. स्वातंत्र्य पूर्वकाळापासुन आजपर्यंत `तरुण भारत’ची निर्भिड आणि परखड अशी वाटचाल अखंडपणे सुरु आहे. सीमालढÎातही तरुण भारत मराठी भाषिकांचे मुखपत्र म्हणून आवाज उठवत आहे. संस्थापक संपादक स्वर्गीय बाबूराव ठाकूर यांनी रोवलेल्या या रोपटÎाचा वटवृक्ष करण्याचे काम समूह प्रमुख अणि सल्लगार संपादक किरण ठाकूर यांनी केले. बेळगांवसह कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सांगली सातारा, सोलापूर आदी जिल्हÎांसह गोव्यातही `तरुण भारत’चा विस्तार केला. समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्यासोबत आज व्यवस्थापकीय संचालक प्रसाद ठाकुर यांनी `तरुण भारत’ समूहाची यशस्वी धुरा सांभाळली आहे. वृत्तपत्रासह आज बँकींग, शिपिंग, टूरिझम, हॉस्पिटÎालिटी आदी क्षेत्रातही त्यांनी यशस्वी वाटचाल केली आहे. तरुण भारत समूहाच्या माध्यमातून समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर आणि परिवाराने सुमारे 8 हजार जाणांना रोजगार देण्याचे काम केल्याचे निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी सांगितले.