लाखो वाचकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱया तरुण भारत या लोकप्रिय दैनिकाने मागील अडीच वर्षांपासून युटय़ुब चॅनेल आणि वेबसाईट च्या माध्यमातून ऑनलाइन बातमीच्या क्षेत्रातही आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. तरुण भारत सोशल मीडियावर दाखल झाल्यापासून असंख्य वाचकांनी दर्शक बनून “तरुण भारत न्यूज” या चॅनेल ला आपली पसंती दिली. केवळ अडीच वर्षात 1 लाख 36 हजार सबस्क्रायबर चा टप्पा या चॅनेल ने ओलांडला. जगभरात आपल्या व्हिडीओ शेयरिंग प्लॅटफॉर्म ने लोकप्रिय ठरलेल्या युटय़ुब कंपनीने याची दखल घेतली असून तरुण भारत ला सिल्वर क्रिएटर पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तरुण भारत च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
1 लाख सबस्क्रायबर चा टप्पा ओलांडणाऱया युटय़ुब चॅनेल्स ना हा पुरस्कार देऊन युटय़ुब कडून गौरव करण्यात येतो. या पुरस्कारामध्ये युटय़ुब चे सिल्वर बटण आणि सीईओ सुजान ओजीसकी यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र समाविष्ट आहे. तुम्ही हे काम पुरस्कारासाठी करीत नाही, मात्र तुमच्या कार्याची दखल घेऊन या कामाला दाद देणे हे आपले कर्तव्य ठरते. आपले चॅनेल या पुढील काळात मिलियन सबस्क्रायबर आणि त्यापुढीलही टप्पे नक्कीच पार करेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
तरुण भारत चे सीईओ दीपक प्रभू यांनी या पुरस्काराबद्दल सोशल मीडिया टीम, टेक्नकिल सपोर्ट देणारा आयटी विभाग आणि रिपोर्टिंग सेक्शन चे अभिनंदन केले आहे. हे सांघिक यश आहे. तरुण भारत चे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनातून हे काम बेळगाव येथून सुरू झाले आणि त्याचा विस्तार आम्ही पश्चिम महाराष्ट्रातही केला असून लवकरच गोवा येथेही हा विस्तार करण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले.
सोशल मीडिया विभागाच्या वतीने बोलताना प्रसाद सु प्रभू यांनी तरुण भारत वर प्रेम करणाऱया लाखो दर्शकांमुळेच हे शक्मय झाले असून यातूनच पुढील टप्पे यशस्वीपणे पूर्ण करू असा विश्वासही व्यक्त केला. तरुण भारत चे Tarun Bharat News हे युटय़ुब चॅनेल तसेच tarun bharat daily हे फेसबुक पेज लाईक करा, सबस्क्राईब करा तसेच ट्विटर, इन्स्टाग्राम व हॅलो वर तरुण भारत ला फॉलोव करायला विसरू नका असे आवाहन केले आहे.









