पुलाची शिरोली / वार्ताहर
आपत्ती व्यवस्थापन समितीच्या जागरुकतेमुळे नागरीकांची आर्थिक लूट थांबली. कंपनीने दिलेली औषधे घेऊन पैसे परत केले. पुलाची शिरोली गावातील कोरोना बाधीतांची वाढणारी संख्या चिंतंनिय ठरत आहे. याचाच गैरफायदा एका औषध संस्थेने घेत हजारो रुपये उकळून नागरीकांची आर्थीक लुट सुरू केली होती. तरुण भारत सोशल मीडियामधून शनिवारी सायंकाळी याबाबतची सविस्तर बातमी प्रसिद्ध झाली होती.
शिरोली गावात सुमारे पावणे दोनशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली आहे. त्यामुळे गाव शुक्रवार पासुन १०० टक्के कडकीत बंद केले आहे. असे असताना उचगाव ता.करवीर येथील एका औषध संस्थेचे प्रतिनिधी घरोघरी जावून औषध विक्री करत होते.
आपल्याकडील वेगवेगळ्या औषधांची विक्री भरमसाठ रक्कम आकारुन शिरोलीच्या माळवाडी भागात करत होते. ही विक्री वैद्यकीय तज्ञांच्या उपस्थित करण्याची कायदेशीर गरज असताना शिरोलीत विक्री करणारा एकही प्रतिनिधी वैद्यकीय क्षेत्रातील नसुन हे लोक आपल्या मुख्य अधिकार्याच्या नावाखाली विक्री करत होते.
ही औषध विक्री करणारे लोक दोन दिवसापासून गावात नागरीकांची पंचवीस रुपये फी आकारुन आरोग्याची मशीनद्वारे तपासणी करत. व त्या व्यक्तीस तुमच्या शरिरात हा घटक कमी आहे , तुम्हाला हे औषध घ्यावे लागेल असे सांगून त्याला ते औषध दिले जात होते. या औषधाची जवळपास २ हजार रूपये किंमत असून ते नागरिकांना घेण्यासाठी भाग पाडत होते. तसेच ग्रामपंचायतीने आपणास लेखी परवानगी दिली आहे. असे सांगितले त्यामुळे हे औषध घेण्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात बळी पडल्या होत्या.
तरुण भारत सोशल मीडियामधून शनिवारी सायंकाळी याबाबतची सविस्तर बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांनी ग्रामस्थांना कर्मचारी मार्फत स्पिकरवरून सावध करण्यात आले.
तसेच दक्षता समिती सचिव सतिश पाटील व अन्य सदस्यांनी औषध विक्रेत्यांना जाब विचारला व औषध विक्री करण्यास मज्जाव केला व नागरीकांचे पैसे परत देण्यास भाग पाडले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









