कोरोनाकाळातही वृत्तपत्र पोहोचविण्याची अखंडपणे बजावली सेवा
बेळगाव / प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या काळात देखील पायलटवरून वृत्तपत्र सेवा गावो-गावी अखंडपणे दिलेल्या तरुण भारत वृत्तपत्राच्या पायलटांचा शनिवारी संस्थेच्या कार्यालयात गौरव करण्यात आला. व्यासपीठावर तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री, वितरण व्यवस्थापक अभिजित ब्रह्मदंडे, जाहिरात वसुली व्यवस्थापक मेघराज सटवाणी, गजानन मोतेकर, सुधीर घोडगे, कुमार पत्की उपस्थित होते.
संपादक जयवंत मंत्री यांनी कोरोनाकाळात न घाबरता गावो-गावी फिरून वृतपत्र पोहोचविण्याचे काम पायलटांनी केले असून पायलटदेखील कोरोनायोद्धेच असल्याचे नमूद केले. प्रारंभी वितरण व्यवस्थापक अभिजित ब्रह्मदंडे यांनी पायलटांचा गौरव करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला.
कोरोना संकटासह थंडी, पावसाची कोणतीही तमा न बाळगता शहरी भागासह ग्रामीण भागातील दुर्गम व डोंगराळ भागात देखील पहाटेच्यावेळी वेळेवर वृतपत्र पोहोचविण्याचे काम करत असलेल्या पायलटांचा प्रमाणपत्र व पुष्प देऊन संपादक जयवंत मंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी रमेश खोत, पायलट मौहसिन बाळेकुंद्री, बाबू कोकितकर, यल्लाप्पा गडकरी, विनायक शहापूरकर, गजानन गडकरी, हेमनाथ सुळेभावीकर, विशाल लोहार, प्रवीण कणबरकर, शिवाजी खोत, विनायक शिंदे, नारायण चौगुले, हरिभाऊ पाटील, काशीनाथ पाटील, अमोल गडकरी यांचा प्रमाणपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रमेश खोत यांनी कोरोनाकाळात वृत्रपत्र पोहोचवताना आलेल्या अडचणी सांगून संस्थेच्या सहकार्यामुळे वृत्तपत्र वेळेवर पोहचवू शकलो, असे सांगितले. याप्रसंगी संदीप सबनीस, विजय शिंगाडे, सचिन बरगे, अनुप पुरोहित, मंदार कोलटकर आदी उपस्थित होते.









