कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर-पावसामुळे ऊसतोड कामगारांच्या झोपडीत पाणी शिरल्याने त्यांची अवस्था दयनीय बनली होती. तरुण भारत वेब ने मदतीचे आवाहन केल्यानंतर नगरसेवक राहुल चव्हाण यांनी 20 कुटुंबाना फूड पॅकेट्सचे वाटप केले.
पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऊसतोड कामगारांच्या झोपड्यांची अवस्था दयनीय झाली होती. झोपड्यात पाणी शिरल्याने अनेकांचा संसार साचलेल्या पाण्यात तरंगत होता. याचे वास्तव तरुण भारतने फेसबुक लाईव्हवर दाखवत मदतीसाठी आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांनी या १५ कुटुंबातील नागरिकांना फूड पॅकेटचे वाटप केले. आज सकाळी तरुण भारतचे फेसबुक लाईव्ह पाहून त्यांनी प्रतिनिधींना मदतीबद्दल सांगितले. रात्री अचानक पाणी साचल्याने आज सकाळपासून कामगार व त्यांची लहान मुले भुकेने व्याकुळ झाली होती. त्यावेळी माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांनी तात्काळ फूड पॅकेट देण्याची व्यवस्था केली.









