प्रतिनिधी /सांगली
तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक व लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर मामा यांच्या वाढदिवसानिमित्त तरुण भारत परिवाराच्या वतीने मंगळवारी सांगली शहरात महापालिका व सांगली शहर पोलीस ठाणे येथे बिस्किटांचे वाटप करण्यात आले .सध्या जगभरात कोरोना व्हायरस या महाभयंकर विषाणूने थैमान घातले असून भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेला २१ दिवसांचा लॉक डाऊन सुरू आहे.या कालावधीत सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनासह महापालिका पोलीस आरोग्य विभाग यांच्याकडून शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबविण्यात आली आहे .
मनपातर्फे शहरात ठिकाणी स्थलांतरित लोकांसाठी निवारा केंद्रे उभारण्यात आले आहेत.या केंद्रातील लोकांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांच्या हस्ते सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे बिस्किटांचे बॉक्स सुपूर्द करण्यात आले. आयुक्त कापडणीस यांनी तरुण भारत परिवाराने किरण ठाकूर मामा यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेच्या निवारा केंद्रातील लोकांसाठी पुढे केलेला मदतीचा हात निश्चितपणे कौतुकास्पद आणि महापालिकेला या महाभयंकर संकटामध्ये काम करण्यासाठी बळ देणारा असल्याचे सांगितले.
यावेळी तरुण भारतचे जाहिरात व्यवस्थापक संजीव डाळिंबकर, मुख्य प्रतिनिधी संजय गायकवाड ,व्यवस्थापक राहुल गोखले, वितरण व्यवस्थापक अनुप पुरोहित शहर प्रतिनिधी सुभाष वाघमोडे विनायक जाधव ,रावसाहेब हजारे ,विक्रम चव्हाण ,सचिन ठाणेकर, मोहन धामणीकर ,निलेश माटले यांच्यासह तरुण परिवारातील सदस्य उपस्थित होते .दरम्यान सांगली शहर पोलीस ठाणे येथे २४ तास ऑन ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनाही तरुण भारत परिवाराच्या वतीने बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
Previous Articleकोरोनामुळे व्हाट्सअप वर मेसेज फॉरवर्ड करण्यास निर्बंध
Next Article इंग्रजी








