अमेरिकेत नवा प्रकार प्रचलित, मोफत आरोग्य विमा, एक महिन्याच्या सुटीची ऑफर
73 वर्षीय बॉब एडम्स अमेरिकेतील सर्वात मोठी ऑफिस पॉड निर्माता कंपनी एआयएससोबत सुमारे 2 दशकांपासून जोडलेले आहेत. अलिकडेच त्यांनी प्रकृतीचा दाखला देत मधूमेह आणि रक्तदाबाच्या समस्येमुळे आठवडय़ातील 4 दिवसच सेवा देऊ शकणार असल्याचे सांगितल्यावर कंपनीने त्यांची मागणी मान्य केली.
अमेरिकेत मोठय़ा संख्येत तरुण-तरुणी नोकऱया सोडत असल्याने नियुक्तीदार त्रस्त झाले आहेत. याचमुळे विश्वासू कर्मचारी शोधणे आणि त्यांना टिकवून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहेत. एआयएसमध्ये 750 कर्मचारी असून यातील 40 टक्के कर्मचारी 50 पेक्षा अधिक वय असलेले आहेत. जुन्या आणि विश्वासू कर्मचाऱयांच्या बळावरच कंपन्या संकटकाळात चांगली कामगिरी करू शकत नसल्याचे यातून समजते.
याचमुळे मायक्रोसॉफ्ट, मॅरियट आणि एआयएस यासारख्या 1000 हून अधिक अमेरिकन कंपन्या एएआरपी एम्प्लॉयर प्लेज प्रोग्रामशी जोडल्या गेल्या आहेत. हा प्रोग्राम नियुक्तीदारांचा समूह असून तो कंपनीच्या विकासासाठी पन्नाशी ओलांडलेल्या अनुभवी लोकांशी जोडले जाण्याची शिफारस करतो. सर्वांना समान स्वरुपात कामाच्या संधी मिळाव्यात आणि यात वय अडथळा ठरू नये हा यामागचा उद्देश आहे. अमेरिकेच्या कामगार विभागानुसार देशातील मनुष्यबळात 50 हून अधिक वय असलेल्या कर्मचाऱयांचे प्रमाण 37.3 टक्के आहे. एएआरपी यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
आकर्षक सुविधा
अमेरिकेतील सर्वात मोठी मिलिट्री शिप तयार करणारी हंटिंग्टन इनगाल्सचा सर्वात मोठा आधार जुने कर्मचारी आहेत. 1600 हून अधिक सहकारी आमच्यासोबत 40 वर्षांपासुन आहेत. कंपनीने स्वतःच्या साइट्सवर फॅमिली हेल्थ सेंटर तयार केले आहेत. कर्मचारी वेल्थ ऍडव्हायजरकडून मोफत सल्ला मिळवू शकतात अशी माहिती सीईओ बिल एर्मिंगर यांनी दिली आहे.