पठ्ठे बापुराव पुण्यतिथी सोहळा; पानितकार विश्वास पाटील प्रमुख पाहुणे
इस्लामपूर / प्रतिनिधी
लोकशाहीर पठ्ठे बापुराव पुण्यतिथी निमित्त यंदाचा पुरस्कार जेष्ठ तमासगीर दत्तोबा तिसंगीकर यांना देण्यात आला आहे. शनिवार दि.२५ डिसेंबर रोजी पानितकार विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन, व लोककला सादीरकरण कार्यक्रम होणार असल्याचे प्रा.शामराव पाटील यांनी सांगितले.
पाटील पुढे म्हणाले, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी, जागर साहित्य कला मंडळ, पठ्ठे बापूराव हायस्कुल रेठरे हरणाक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारंभ होणार आहे. राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीमध्ये सायंकाळी ५ वाजता हा समारंभ होईल. यावेळी प्रा.चंद्रकुमार नलगे यांच्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव या पुस्तकाचे प्रकाशन विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान लावणी, हलगी वादन, ढोलकी वादन होईल. या समारंभात द.म.साचे अध्यक्ष विजय चोरमारे, प्रा.नलगे, प्राचार्य विश्वास सायनाकर, इटकरेचे माजी सरपंच सुभाष पाटील, जेष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती राहणार आहे. या समारंभाचे संयोजन बाबासाहेब पवार, पंढरीनाथ शेवाळे, प्रा.वि. द. कदम, प्रा.एन. एस. क्षीरसागर, प्रा.डॉ. दीपक स्वामी हे करीत आहेत.








