वार्ताहर / कुंभोज
तत्कालिन कृषि पणनमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या दुर्गेवाडी येथील सुमारे पंच्याहत्तर लाख रूपये खर्चाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले आहे.त्यामुळे तब्बल ३५ वर्षाच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर येत्या दोन-चार दिवसात धरणग्रस्त दुर्गेवाडी वसाहतील स्वच्छ,मुबलक,फिल्टरयुक्त पाणी मिळणार आहे.
सन् १९८६ मध्ये कुंभोज-हिंगणगाव रस्त्यालगत दुर्गेवाडी वसाहत नंबर एक वसली तर सन् १९८९ मध्ये कुंभोज-दानोळी रस्त्यालगत दोन नंबरची वसाहत वसली आहे.सन् २०१० मध्ये तत्कालिन सरपंच शादीक वारूणकर,सचिन घोलप,संदीप घोलप,अमिना शादीक वारूणकर,लक्ष्मी घोलप,जुम्माबी पटेल यांनी ग्रामपंचायतीव्दारे योजना राबविण्याचा निणर्य घेतला.वारणा नदीकाठी जॅकवेलसाठी दोन गुंठे जागा घेवून या योजनेचा प्रस्ताव दाखल केला.मात्र कांही कारणास्तव प्रशासकिय मंजूरी रखडली.सन् २०१८ मध्ये तत्कालिन सरपंच अशोक पाटील,शादीक वारूणकर,अजय घोलप,शोभा घोलप,हिराबाई कदम,कलावती नांगरे,गुणाबाई पाटील यांनी कृषि पणनमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे प्रयत्न केले.
मंत्री श्री.खोत यांनी धरणग्रस्त गाव म्हणून शासनस्तरावर प्रयत्न करून विशेष बाब म्हणून या योजनेस मंजूरी मिळवली.यासाठी तत्कालिन आमदार डॉ.सुजित मिणचेकर,जि.प.सदस्य प्रविण यादव यांचे सहकार्य लाभले.जिल्हा नियोजन मधून खासदार धैर्यशिल माने,आमदार राजुबाबा आवळे यांच्या प्रयत्नातून वीज जोडणीसाठी सुमारे सहा लाखांचा निधी मिळाला.योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी गावपातळीवर कमिटी स्थापन केली.अध्यक्षपदी सचिन घोलप तर सचिवपदी प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली.सदस्य म्हणून शादीक वारूणकर,हरी सावंत,अजय घोलप,फातिमा पटेल,संदीप घोलप,बंडू पाटील,धोडीराम पाटील,सुरेखा घोलप यांची निवड केली.योजनेसाठी उपसरपंच सचिन घोलप,शादीक वारूणकर,सुनिल पाटील,लता दीपक पाटील,संगीता विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या बरोबरच या वैभागातील लोकप्रतिनिधी,गावातील विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,तरूण,महीला मंडळे व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. सचिन घोलप,अध्यक्ष पाणी पुरवठा कमिटी, दुर्गेवाडी पाणी योजनेस प्रारंभापासूनच मोठे सहकार्य लाभले.त्यांच्या मदतीने ही योजना पूर्णत्वास नेताना समाधान वाटत आहे.या योजनेचे दर्जेदार काम केले असून,गावाला स्वच्छ,मुबलक पाणी मिळणार आहे.प्रदिप पाटील,ठेकेदार कोल्हापूर.









