प्रतिनिधी / बेळगाव
तब्बल दोन महिन्यानंतर आज सकाळी बेळगाव विमानतळावर विमान दाखल झाले. काही मोजक्या प्रवाशांना घेऊन स्टार एअरचे विमान बेंगळुरवरून बेळगाव विमानतळावर दाखल झाले. आलेल्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. प्रवाशांना पार्किंगमध्येच वाहने लावण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. टर्मिनल जवळ वाहने आणण्यास परवानगी नव्हती. हेच विमान काहीवेळाने अहमदाबादला रवाना झाले. प्रवाशांची संख्या कमी असली तरी बेळगावचे सांबरा विमानतळ पुन्हा एकदा गजबजलेले आले. विमानतळ प्रशासनाने सर्व ती खबरदारी घेतली होती. विमानसेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान आहे.









