प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात दरवर्षी सुमारे 100 नव्या मिळकतींची भर पडत आहे. या नव्या मिळकतींची नोंदणी चतुर्थ वार्षिक पाहणी पत्रानुसार करपात्र अद्याप गेल्या आठ वर्षात पालिकेच्या वसुली विभागाकडे नोंद झालेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेला कोटय़ावधी रुपयांचा महसुल बुडाला आहे. सोमवारीपासून या चुतर्थ वार्षिक पाहणीच्या कामाला सुरुवात होणार होती. परंतु वसुली अधीक्षक अन्य कामानिमित्ता बाहेर गेल्याने नियुक्तीच्या ऑर्डरी टायपिंग केलेल्या सहीवाचून तशाच पडून राहिल्या आहेत. येवू घातलेल्या निवडणूकांमुळे हे काम पूर्ण होणार काय असाही यक्ष प्रश्न उपस्थित रहात आहे.
सातारा शहराची चुतर्थ वार्षिक पाहणी 2014 मध्ये झाली होती. 2015 ते 2019, 2020 ते 2024 अशा कालावधीचे पाहणीपत्रक झाले नाही. त्यामुळे शहरात दरवर्षी सुमारे 100 मिळकतींची भर पडत आहे. त्या मिकळतींकडून अद्याप पालिकेकडे कसलाही कर भरणा झालेला नसल्याने कोटयावधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. वर्षाला किमान कर रुपाने कोटय़ावधी रुपयांचा कर जमा झाला असता परंतु पाहणी पत्रकच झाले नसल्याने कर मागणीच्या नोटीस त्या नव्या मिळकतधारकांना गेल्या नाहीत. आता मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी गेल्या चार दिवसांपूर्वी वसुली विभागाचे अधीक्षक प्रशांत खटावकर यांना सुचना दिल्या आहेत. त्यांच्याकडून कशा पद्धतीने ही पाहणी करायची. त्याकरता 22 लिपिकांची नियुक्ती करायची असे सांगितले अन् त्या 22 लिपिकांच्या नियुक्तीच्या ऑर्डरी काढण्याकरता सोमवारी टापपिंग करुन तयार केल्या आहेत. परंतु त्यावर मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची सही घेण्यासाठी वसुली अधीक्षक खटावकर हेच कार्यालयात नसल्याने ते काम आता थांबले आहे. दरम्यान, येवू घातलेल्या निवडणूकाच्या काळात हे काम पूर्ण होणार काय याकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, पालिकेचा दर चार वर्षानी जर चतुर्थ वार्षिक पाहणी अहवाल पूर्ण झाला असता तर पालिकेच्या तिजोरीत कर जमा झाला असता. आताही हे काम पुर्ण होणार काय याकडे लक्ष लागून राहिले आहे.









