प्रतिनिधी/ बेंगळूर
दिल्लीच्या निजमुद्दिन भागातील तबलिग जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कर्नाटकातील 13 जण कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये बेळगावातील तिघांचाही समावेश आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली आहे.
कर्नाटकातील कोरोना विषाणूसंबंधी प्रसारमाध्यमांना माहिती देण्याची जबाबदारी शुक्रवारी सुरेशकुमार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. बेंगळूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, दिल्लीतील तबलिग समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन कर्नाटकात परतलेल्यांपैकी 13 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तेथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या 187 जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उर्वरित 88 जणांचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही, अशी माहिती दिली.









