कोल्हापूर : प्रतिनिधी
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी एका कार्यक्रमात पत्रकाराशी बोलताना महाविकास आघाडीवर टिका केली. महाविकास आघाडीचे नेते काहीही म्हणत असले तरी तपास यंत्रणा स्वायत्त आहेत त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर बोलण्याचा प्रश्नच येत नाही. यशवंत जाधवांची डायरी सापडली का? त्यात काय आहे मला माहिती नाही?पण खुप काही तरी होणार आहे इतकंच मला दिसतंय अशी प्रतिक्रिया दिली.
पुढे बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, भातखळकरांनी केलेली मागणी योग्यच असून या चौकशीतुन आता कोणी सुटत नाही. संजय राउताबद्दल बोलताना माझी राऊतांकडून चेष्टा केली जाते, मात्र ती आता त्यांच्या अंगावर येणार आहे मी सामना वृत्तपत्र वाचन आणि संजय राऊतवर बोलणे मी बंद केले आहे.
सांगलीतील अहिल्यादेवी स्मारक उद्घाटना संदर्भात बोलताना भाजपची सत्ता असताना अहिल्यादेवी स्मारकाची उभारणी झाली, मग शरद पवार उद्घाटनाला कशासाठी ? शरद पवार येणार म्हणून फक्त दोन तारखेपर्यंतच 144 कलम लावल आहे. लावायचा असेल तर पंधरा दिवस लावा. जिल्ह्यातील केवढी पोलिस यंत्रणा ताब्यात घेतली ? पोलीस यंत्रणेला माझा इशारा आहे, हे फार दिवस नाही चालणार.कोल्हापुरात ही हे सुरू झालय आठ वर्षांपूर्वीच्या केसेस काढल्या जाताहेत, प्रसंगी पोलीस स्टेशनला घेराव घालू, सोडणार नाही.
किरीट सोमय्या यांच्यावर होणाऱ्या नौटंकीच्या आरोपावर बोलताना पुढे ते म्हणाले किरीट सोमय्या सर्व मंत्र्यांचा कर्दनकाळ ठरले आहेत, सगळ्या मंत्र्यांना सोमय्यांची भीती आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा बांधून ठेवल्या आहेत. राजू शेट्टी म्हणाले ते खरं आहेत, अजितदादा कडूनच आशा आहेत त्यांच्यात धमक आहे, दादाना एवढंच सांगेन जरा प्रेमाने घ्या.
उद्धव ठाकरेबद्दल बोलताना, मला उद्धवजीची कुंडली बघायची आहे, फार भाग्यवान माणूस जन्माला आलाय. कशाचं सोयर सुतक नाही पण त्यांना कोणी हलवू शकत नाही,कारण सर्वांची मजबुरी आहे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे कडे जातात अजित दादांकडे जातात नाहीय. कोल्हापूर उत्तर उत्तर विधानसभेवर भाष्य करताना, 3 लाख मतदारांना भाजपचे तीन लाख कार्यकर्ते भेटतील असे म्हणाले









