प्रतिनिधी / बेळगाव
लग्नसराई म्हणजे दागदागिने हे समीकरण भारतात प्राचीन काळापासून चालत आले आहे. आणि आजच्या आधुनिक युगातही कायम आहे. भारतातील सर्वात विश्वसनीय आणि ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीच्या दागिन्यांचा बँड तनिष्कने लग्नातील खास दागिन्यांसाठी तयार केलेला आपला उपब्रँड आता एका नव्या रुपात प्रस्तुत केला आहे. रिवाह-‘अ ज्वेल फॉर एव्हरी ट्रडीशन’ (प्रत्येक परंपरेला अनुसरून खास दागिने सादर करणारा ब्रँड-रिवाह)
लग्नकार्यामध्ये परंपरा, विधींना अनन्यसाधारण महत्त्व असते. लग्नात परिधान केले जाणारे दागिने या परंपरांची प्रतिके असतात. ही भावना समजून घेत रिवाह बाय तनिष्कने ‘ज्वेल फॉर एव्हरी ट्रडीशन’ अर्थात प्रत्येक परंपरेला अनुसरून दागिना, या बँडची नवी ओळख खास मिलेनियल नववधूंसाठी प्रस्तुत केली आहे. लग्नामध्ये नववधू जे दागिने परिधान करते, ज्या परंपरांचे पालन करते त्या प्रत्येकाचा अर्थ आणि महत्त्व रिवाह बाय तनिष्कच्या या नव्या ब्रँड विधानामधून अधोरेखित करण्यात आला आहे. प्रतिकात्मकता आणि भावना यांनी ओतप्रोत भरलेल्या एका सुंदर कथेमधून हे नवे ब्रँड विधान प्रस्तुत करण्यात आले आहे. रिवाह बाय तनिष्कमध्ये प्रत्येक प्रांतानुसार खास दागिने सादर करण्यात आले आहेत. पारंपरिक डिझाईन्स आणि आधुनिक लूक असा सुरेख मेळ या दागिन्यांमध्ये साधलेला दिसतो. तनिष्कच्या अत्युत्तम कारीगरीने या पारंपरिक दागिन्यांना नवी शान व नव्या युगातील सौंदर्यदृष्टीचा साज चढवला आहे. मनमोहक, सुबक कारीगरी आणि भारतातील विविध राज्यांमधील फुलकारी, गोटापट्टी, सुजानी, काशिदा, कंथा यासारख्या नक्षीकलांपासून प्रेरणा घेऊन नव्याने निर्माण करण्यात आलेली डिझाईन्स हे तनिष्कच्या रिवाहचे वैशिष्टय़ आहे. पुष्प, वेलबुट्टी, पाईन, चिनार, भौमितिक रचना अशा भारतीय धागा कलाकारीतील उंची पॅटर्न्स आम्ही निवडल्या आहेत. रिवाहमधील नवीन डिझाईन्समध्ये स्प्रिंग वायर, चांडक, फिलग्री, रावा इत्यादी अनोख्या कारीगरी तंत्रांचा वापर करण्यात आला आहे.









