वृत्तसंस्था /मुंबई :
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातील शेअर बाजार चिंतेत होते. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणसोबतचा वाद न वाढवता, शांततेचा संदेश दिला आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स 634.61 अंकानी वधारुन 41,452.35 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 190.55 टक्क्यांनी वाढून निर्देशांक 12,215.90 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमधील बीएसईमधील 26 कंपन्याचे समभाग तेजीत राहिले आहेत. तर दुसरीकडे 4 कंपन्याचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत. राष्ट्रीय शेअर बाजारातील तबब्ल 43 कंपन्याच्या समभागांचा लिलावासह 7 कंपन्यांचे समभागाची विक्रीची नोंद केली आहे.
दिवसभरातील व्यवहारातील आयसीआयसीआय बँकेचे समभाग सर्वाधिक म्हणजे 3.80 टक्क्यांनी वधारले आहेत. तर सोबत स्टेट बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, इंडसइं ड बँक, मारुती सुझुकी, एशियन पेन्ट्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसरकीकडे टीसीएस, एचसीएल टेक, एनटीपीसी आणि सन फार्मा यांचे समभाग 1.73 टक्क्यांनी घसरले आहेत.
अर्थसंकल्पाकडे बाजाराची नजर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल 40 अर्थतज्ञांच्या सोबत गुरुवारी बैठक घेतली आहे. यामध्ये अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आधारीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात बाजाराचा कल तेजीकडे राहण्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.
मुख्य क्षेत्राची कामगिरी
वाहन, बँकिंग, औद्योगिक, फायनान्स,ऊर्जा या क्षेत्रातील कंपन्यांमधील 2.83 तेजीत राहिले आहेत. तर आयटी क्षेत्रात घसरण झाली आहे.