प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे मानसिक ताण प्रचंड प्रमाणात वाढला. मात्र केवळ नोकरदार मुले, महिला यांच्यावरच ताण आला असे नाही तर डॉक्टरांच्यावरही विलक्षण ताण आला आहे. त्यामुळे डॉक्टरांसाठी सुरू करण्यात आलेल्या मानसिक हेल्पलाईन (सायकीऍट्री) ला डॉक्टरांचा प्रतिसाद वाढला आहे.
कोरोना काळात डॉक्टरांवरही विलक्षण ताण आला. रुग्णांवर उपचार करताना आपल्याला सुद्धा लागण होवू शकते या भीतीने हा ताण वाढत गेला. या पार्श्वभूमिवर जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कर्नाटकाच्या आयएमए शाखेने कर्नाटकाच्या इंडियन सायकीऍट्री शाखेच्या सहकार्याने हेल्पलाईन सुरू केली. याचे मुख्य कारण म्हणजे कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱया तालुकास्तरीय आरोग्याधिकाऱयांनी आत्महत्या केली आणि डॉक्टरांवरील ताण किती प्रमाणात वाढला आहे? हे वास्तव अधोरेखित झाले.
आयएमएने सुरू केलेल्या हेल्पलाईनवर दररोज वेगवेगळे मानसोपचारतज्ञ मार्गदर्शन करत असून नैराश्याने ग्रासलेल्या डॉक्टरांचे समुपदेशन करत आहेत. आतापर्यंत जवळजवळ 26 हजारांहून अधिक डॉक्टरांनी हेल्पलाईनला फोन करून सल्ला घेतला आहे.
सर्व डॉक्टरांच्यामध्ये प्रामुख्याने कोरोना काळात आलेला ताण आढळतो. रुग्णांशी संपर्क आल्याने आपल्याला कोरोना होईल ही भीती, रुग्णांकडून दिला जाणारा त्रास आणि कुटुंबासमवेत वेळ घालविणे शक्मय नसणे, विवाह ठरण्यामध्ये अडचणी अशा अनेक कारणांनी डॉक्टरांवर ताण आला. या शिवाय कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांची संख्या ही सुद्धा डॉक्टरांवर ताण येण्याचे कारणे ठरली, असे आयएमएच्या मानसोपचार विभागाचे चेअरमन कारंथ यांनी सांगितले.
बहुसंख्य डॉक्टरांना आपल्या वयोवृद्ध पालकांना किंवा मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती होती. क्वारंटाईन झाल्यास आर्थिक नुकसान होणार होते. या सगळय़ा गुंतागुंतीमुळे त्यांच्यावर ताण आला. मुख्य म्हणजे बहुसंख्य डॉक्टरांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आहे. मात्र हेल्पलाईनमुळे बऱयाचशा डॉक्टरांना लाभ झाला, असे कोअर समितीचे सदस्य डॉ. गणेश प्रसाद यांनी सांगितले.









