प्रतिनिधी / कडेगाव
कडेगाव तालुक्यातील तडसर येथील आनंदराव बाबुराव पवार(वय ७८) यांनी शेतात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली असून भारतातील निर्यातीत गुलाबी पांढऱ्या व्हरायटी जातीचे निर्यात करणारे पहिले शेतकरी ठरले आहेत. ५० किलोच्या “कमलम’ (ड्रॅगन फ्रूट)ची निर्यात दुबईमध्ये केली गेली आहे. दुबईला निर्यात करण्यात आलेल हे ड्रॅगन फ्रूट सांगली जिल्ह्यातील तडसर या गांवच्या मातीत पिकविण्यात आले आहे.
मेसर्स केबीन ड्रॅगन फ्रूटची ही पहिलीच खेप दुबईला सरकारच्या संस्थेच्या एपी एडीएद्वारा मान्यताप्राप्त निर्यातकानी पाठवली आहे. तडसरसारख्या डोंगराळ प्रदेशात कँक्टस प्रजातीचे पीक घेण्याचे धाडस करणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी ठरले आहेत. या फळामध्ये कमळासारखे दिसणाऱ्या पाकळ्या असल्याने त्याला “कमलम’ असे संबोधले जाते.

तडसर समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० मीटर उंच आहे पवार यांनी सहा वर्षापूर्वी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली सातारा येथील कोरडवाहू शेतकऱ्याकडून याबाबतची माहिती घेतली मी ऊस पिकाऐवजी ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यात आली ऊस व द्राक्ष पिकाच्या तुलनेत या पिकाला पाणी कमी पाण्याची गरज लागते तसेंच सेंद्रिय खताचा वापर करण्याचे सुनिश्चित केले दुबईच्या निर्यातीसाठी ४०० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाची फळे निवडली गेली सेंद्रिय शेती पद्धतीने वजन व चव वाढविण्यात मदत झाली. कडेगाव तालुक्यात ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढतच आहे. हे फळ मानवाच्या मोठ्यातल्या मोठ्या रोगावर गुणकारी आहे. रोगप्रतिकार शक्तीपासून ते कॅन्सर विरोधी शक्तीपर्यतही ड्रॅगन फ्रूट हे मानवाच्या शरीरासाठी खूपच लाभदायक आहे.








