तारा सुतारिया अन् अहान शेट्टीचा चित्रपट
सुनील शेट्टीचा पुत्र अहान लवकरच तडप चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अहानसोबत तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. अलिकडेच फॉक्स स्टार स्टुडियोजकडून चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर सादर करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये रोमान्स, ड्रामा, जबरदस्त ऍक्शन दिसून येतोय. मिलन लुथरिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

अहान शेट्टीच्या बॉलिवूड पदार्पणासोबत ही लव्ह स्टोरी तेलगू ब्लॉकबस्टर आरएक्स 100 चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. तसेच हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला मोठा कॅनव्हास रोमांटिक ड्रामा असेल. या चित्रपटाला प्रीतम यांचे संगीत दिग्दर्शन लाभले आहे.
महामारीदरम्यान प्रेक्षकांसाठी हा चित्रपट उत्तम पर्याय ठरणार आहे. पटकथा, अभिनय, मुख्य जोडीमधील केमिस्ट्री, संगीत हे सर्व काही तडप चित्रपटातून मिळेल असे निर्माते साजिद नाडियावाला यांनी म्हटले आहे. हा चित्रपट 3 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.









