अभिनेत्री नर्गिस फाकरीचा दावा
अभिनेत्री नर्गिस फाकरीने ‘रॉकस्टार’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडमध्ये ती यशस्वी ठरेल असे मानले जात होते, पण ती फार चित्रपटांमध्ये दिसून आली नाही. अनेकदा मिळालेल्या शस्त्रक्रियेच्या सल्ल्यांपासून कास्टिंग काउचबद्दल नर्गिसने आता स्वतःचे मन मोकळे केले आहे.

मला प्रसिद्धीचा हव्यास नाही. तडजोड न केल्याने अनेक चित्रपटांच्या संधी मी गमावल्या आहेत. बॉलिवूडमध्ये स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. पण मी माझ्या तत्वांना मुरड घालणार नाही. जे लोक स्वतःच्या तत्वांवर ठाम राहतील तेच जिंकतील असे मी स्वतःला बजावत आले आहे. स्वतःशी प्रामाणिक राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नर्गिसने म्हटले आहे. मॉडेलिंगवेळी मला अनेकदा टॉपलेस शॉट्ससाटी विचारणा झाली, पण मी स्पष्ट नकार दिल्याचे ती सांगते.
नर्गिस ही मूळची अमेरिकन-पाकिस्तानी मॉडेल आहे. नर्गिस सध्या न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास आहे. मद्रास कॅफे, किक आणि हाउसफुल 3 या चित्रपटांमध्ये नर्गिसने काम केले होते. 2020 मध्ये प्रदर्शित तोरबाज या चित्रपटाद्वारे ती यापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.









