प्रतिनिधी/ दापोली
तटरक्षक दलाची हॉवरक्राफ्ट नौका दापोलीच्या पाळंदे समुद्रकिनारी बुधवारी सकाळी आढळून आली. तांत्रिक बिघाडामुळे ती दापोलीच्या किनारी आल्याचे बोटीवरील कर्मचाऱयांकडून सांगण्यात आले. हे हॉवरक्राफ्ट पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली.
हीच हॉवरक्राफ्ट नौका मंगळवारी दापोली तालुक्यातील कोळथरे समुद्रकिनाऱयावर ग्रामस्थांना आढळून आली होती. ही नौका पाणी, जमीन, बर्फ, वाळू यातून सहज मार्गक्रमण करू शकते. तटरक्षक दलाची ही नौका असल्याने ग्रामस्थांनी जवळ जाऊन त्यांना काही मदत पाहिजे का, याची विचारणा केली. मात्र बोटीवरील कर्मचाऱयांनी तांत्रिक बिघाडामुळे ही बोट पाळंदे समुद्रकिनारी आणल्याचे सांगितले. हे हॉवरक्राफ्ट पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होते.









