तजेलदार आणि तेजस्वी त्वचा कोणाला नको असते? त्वचा उजळवण्यासाठी विविध प्रकारची क्रीम्स, लोशन्स तसंच मेक अप उत्पादनांचा वापर केला जातो. मात्र यातल्या घातक रसायनांमुळे त्वचेही हानी होण्याची शक्यता अधिक असते. त्वचा उजळवण्यासाठी फार काही करण्याची आवश्यकता नसते. काही घरगुती वस्तूंचा वापर करून तुम्ही त्वचेला नवतजेला देऊ शकता. तजेलदार त्वचेसाठी कोणत्या घटकांचा वापर करता येईल याविषयी…
दही- दह्यामध्ये त्वचा उजळवणारे गुणधर्म असतात. दह्यामुळे त्वचेच्या पेशींना पोषण मिळतं. दह्याने मसाज केल्याने त्वचेवरील मृतपेशी निघून जातात आणि त्चचा तजेलदार दिसू लागते.
लिंबू – लिंबाचा रसही खूप उपयुक्त आहे. लिंबाच्या रसातले अनेक घटक त्वचेचं झालेलं नुकसान भरून काढतात आणि चेहर्याला नवतजेला देतात. लिंबाच्या रसाने चेहर्याला मसाज केला तर काळपट डाग निघून जातात आणि सुरकुत्या पडण्याची
समस्याही दूर होते.
पपई- पपई आरोग्यदायी आहे हे आपण जाणतो. पपईचा गर लावल्याने त्वचा उजळते. त्यातही कच्च्या पपईचा वापर केल्याने अधिक लाभ होऊ शकतात. कच्च्या पपईच्या गरात लिंबाचा रस आणि मध घालून हा लेप चेहर्याला लावा. चेहरा उजळ दिसू लागेल.
बटाटा – बटाटय़ामुळेही कांती चमकदार दिसू लागते. बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या. त्यात थोडं दही घालून पेस्ट तयार करा.
साधारण पंधरा मिनिटं चेहर्याला लावून ठेवा. मग थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमचा चेहरा तजेलदार दिसू लागेल.









