प्रतिनिधी/ बेळगाव
रॉकेट तंत्रज्ञान, उपग्रह याद्वारे देशाची अभिवृद्धी, युद्धकौशल्य, कृषी, बागायत, माहिती तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात आपण प्रगती साधू शकतो. विद्यार्थ्यांनी देशातील कृषी समस्या, ग्रामीण विकास, शहरातील समस्या यांचा पूर्ण अभ्यास करावा आणि त्यांची सोडवणूक करण्यास पुढे यावे, असे विचार बेंगळूरच्या इस्रो संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. गिरीश पुजार यांनी व्यक्त केले.
अंगडी तांत्रिक महाविद्यालयाला नुकतीच त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राचार्य डॉ. आनंद देशपांडे यांनी डॉ. गिरीश यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. स्फूर्ती पाटील, राजू जोशी, प्रा. नागराज पाटील आदी उपस्थित होते.









