ऑनलाईन टीम / पुणे :
मिसमॅच डे…स्टाईल डे…हॅलोवीन डे..तसेच पेशव्यांचा कारभार…शिवरायांचा राज्यभिषेक…राम वनवास…पालखी सोहळा या सोबतच विविध नाटीकांमधून विद्यार्थ्यांनी सवर् धर्म समभावाचा संदेश दिला. खराडी येथील ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात डे साजरे केले.
ढोले पाटील एज्युकेशन इन्सिट्यूटचे संचालक सागर ढोले पाटील, उमा ढोले पाटील, प्रा. निहार वाळिंबे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम देखील यावेळी सादर करण्यात आले.









