वार्ताहर / म्हैसाळ
मिरज तालुक्यातील ढवळी येथे शनिवारी आगीत जळालेला ऊस तातडीने नेण्यासाठी श्रीगुरूदत्त टाकळी वाडी साखर कारखान्याने पुढाकार घेतला आहे.यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना धीर मिळाला आहे. या कारखान्याचे ऊस नोंद अधिकारी चंद्रकांत मगदूम यांनी शनिवारी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने कार्यवाही केली.आणी जळीत ऊस नेण्यासाठी तोडी सुरू केल्या.याबद्ल शेतकरी त्यांचे कौतुक करीत समाधान व्यक्त केले आहे.
शनिवारी अचानक आग लागून शेकडा एकर ऊस जळाला.त्यामुळे अगोदरच महापुराने ऊसाचे नुकसान झाले होते.आणी आता आगीने ऊसाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.आता जळीत ऊस लवकर न गेल्यास हाती काहीच लागणार नाही या चिंतेत शेतकरी होता.दरम्यान या कारखान्याचे व्यवस्थापणाने दखल घेऊन ऊसतोडणी सुरू केली.व ऊस कारखान्याला घेऊन जात आहे.याबद्ल ऊस उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.इतर कारखान्यांनी ही सहकार्य करावे अशी मागणी होत आहे.









