सलग दुसऱ्या दिवशी फोंडा-मडगांव महामार्ग वाहतुकीसाठी बंदच
प्रतिनिधी/ फेंड़ा
फोंडा-मडगांव महामार्गावर ढवळी येथील आरके भंगरअड्डयाला लागलेली भिषण आग सलग दुसऱ्या दिवशीही धुससत आहे. सदर घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेला फोंडा-मडगांव महामार्ग 28 तास उलटल्यानंतरही काल शनिवारी सायंकाळपर्यत वाहतूकीसाठी खुला करण्यात न आल्यामुळे वाहनचालकांचे बरेच हाल झाले. प्रवाशी बसही अन्य मार्गाने वळविण्यात आल्यामुळे कामगार वर्गालाही वेळेत कामावरा पोचण्यासाठी फटका बसला.
ढवळी येथील भंगारअड्डयाला भिषण आग लागून कोठ्यावधी रूपयांच्या मालमत्तेची हानी झाल्याची घटना शुक्रवारी 5 मे रोजी दुपारी 1 वाजण्याचा सुमारास उघडकीस आली होती. त्यानंतर आग विझवण्यासाठी राज्यभरातून अग्निशामक दलाने महत्वाचे मतदकार्य करीत आग आटोक्यात आणण्यात शर्थीचे प्रयत्न केले. सद्या अग्निशामक दलाने आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलेले आहे. भंगारअ•यातील रसायनयुक्त बॅरल, प्लास्टीक, रबरचे साहित्य, लाकडाचा साठा मोठया प्रमाणात असल्यामुळे आग धुमसत आहे. जोपर्यत आग विझवणयाचे काम पुर्णत: बंद होऊन अग्निशाकम दलातर्फे ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत फोंडा-मडगाव वाहतूकीसाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक कृष्ण सिनारी यांनी दिली आहे. सद्या मडगावहून फोंडामार्गे होणारी वाहतूक साकवार बोरीहून अडूशे-वाडी-तळावलीहून फोंडयाकडे वळविण्यात आलेली असून दुसऱ्या बाजूने बोरी-बेतोडा बगलरस्तावरून करण्यात येत आहे. वाडी तळावली मार्गावर भूमिगत वीजवाहिनीसाठी खोदकाम व बोरी बेतोडा बगलमार्गाचे रस्ता रूंदीकरणासाठी खोदकाम सुरू असल्यामुळे वाहतूक वळविण्यात आलेल्या मार्गावर वाहतूक कोंडीतून वाट काढावी लागत आहे.
अग्निशामक दलाची कौतुकास्पद कामगिरी
अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर घटनास्थळी पोचून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात पुढाकार घेतला. यावेळी उपसंचालक राजेंद्र हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा अग्निशामक दलासह राज्यभरातून कुडचडे, मडगांव, वेर्णा, कुंडई, पणजी, ओल्ड गोवा हून सुमारे 12 अग्निशामक दलाचे बंबाचा वापर करण्यात आला. तसेच उत्तर गोव्यातून आग आटोक्यात आणण्यासाठी खास टर्न टेबल लॅडर (टीटीएल)यंत्रणा असलेले वाहनामुळे आगीवय नियंत्रण मिळवण्यासाठी मोटी मदत झाल्याची माहिती फोंडा अग्निशामक दलाचे सुशील मोरजकर यांनी दिली. सद्या सुमारे 1 लाख लिटर पाण्dयाचा फवाऱ्यासह फॉमचा वापर करण्यात आलेला आहे.
भंगारअड्डयालगतच्या भाड्याच्या खोली जळून खाक
सदर घटनेत जिवितहानी टळली असली तरी आरके भंगारअ•याला लागून 4 खोल्या आगीत भस्मसात झाल्या आहेत. ढवळी येथील स्थानिकांच्या मालकीच्या त्या खोल्या असून मागील काही वर्षापासून बिगरगोमंकीय भाडयाच्या खोलीत वास्तव्यास आहेत. आगीत भस्मसात संसार उध्वस्त झाल्याने त्या 4 कुटूंबियांच्या सदस्यानी निवारा उपलब्ध करून देण्यात यावा असे आवाहन सरकार दरबारी पेले आहे. स्थानिक आमदारांनी कुटूंबियांच्या निवारासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती त्यानी यावेळी देण्यात आली.









