ढवळी ग्राम पंचायत निवडणुकीत गड आला पण सिंह गेला
हातनूर / वार्ताहर
आटपाडी येथे मेडिकल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मार्फत आयोजित क्रिकेट सामन्यात शनिवारी दि १६ रोजी दुपारी खेळत असताना कै. अतुल पाटील यांना तीव्र प्रमाणात ह्रदय विकाराचा झटका आला व ते मैदानावर जोरात पडले. काही वेळातच उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांची प्राणज्योत मावळली. व संपूर्ण ढवळी गावावर तसेच मेडिकल असोसिएशन तसेच मित्र परिवारात शोककळा पसरली होती.
शनिवार पासून ढवळी ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या युवा उपसरपंचाच्या मृत्यू दिवसापासून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले होते. झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कै. आतुल पाटील मोट्या फरकाने विजयी झाले. पण ढवळी ग्राम पंचायत निवडणुकीत गड आला पण सिंह गेला व गाव खंबीर नेतृत्वाला पोरखा झाला.
आटपाडी येथे क्रिकेट खेळताना ह्रदय विकारच्या झटक्याने निधन झालेले ढवळीचे युवा उपसरपंच कै अतुल पाटील ५७ मतांनी विजयी झाले. पण हा आनंद कसला वाघच निगुण गेल्याने गावाची शानच लोपली अशा दुःखद प्रतिक्रिया मित्रपरिवार व ग्रामस्थातून व्यक्त होत आहेत.








