सावंतवाडी / प्रतिनिधी:
सावंतवाडी तालुक्यात येत्या 11 ते 13 जून कालावधीत ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे, गोठवेवाडी, असनिये येथील डोंगर खचण्याची दाट शक्यता आहे. तर बांदा येथे पूरस्थिती ओढावणार असल्याने सावंतवाडीत पुण्याहून 0.5bn ndrf अनुपम श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली NDRF च्या 2 टीम दाखल झाल्या असून असिस्टंट कमांडंट जस्टीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली 2 टीम सिंधुदुर्गातील सावंतवाडी आणि कुडाळ येथे कार्यरत झाल्या आहेत अशी माहिती सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, एनडीआरएफचे जस्टीन जोसेफ यांनी दिली.
Previous Articleसिटी स्कॅनसाठी फोंडय़ातील सामान्य रुग्णांना भुर्दंड
Next Article कोरोना मार्गदर्शक नियम धाब्यावर









