अमेरिकेच्या कामगिरीने सर्वजण अवाप्
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
अमेरिकेच्या नौदलाने मानवरहित ड्रोन टँकरद्वारे आकाशात एफ/ए-18 सुपर हॉर्नेट लढाऊ विमानात इंधन भरून इतिहास रचला आहे. अमेरिकेच्या या तंत्रज्ञानाच्या सादरीकरणामुळे पूर्ण जग अवाप् झाले आहे. एखाद्या ड्रोनद्वारे लढाऊ विमानात एअर रिफ्यूलिंग करण्याच ही पहिलीच वेळ आहे. बोइंगचे एमक्यू-25 स्टिंग्रे या ड्रोनचा वापर करण्यात आला आहे.
हे परीक्षण इलिनोइसच्या मस्कौटामध्ये मिडअमेरिका वायुतळापासून काही अंतरावर आकाशात पार पाडण्यात आले आहे. या ड्रोनला अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांवरून संचालित करण्याची योजना आहे. यामुळे लढाऊ विमानांना रिफ्यूलिंगसाठी वारंवार युद्धनौकेवर उतरण्याची गरज भासणार नाही. विमानवाहू युद्धनौकेवरून उड्डाण करता लढाऊ विमानांना स्वतःच्या पूर्ण इंधन क्षमतेचा वापर करता येत नाही. अशा स्थितीत लढाऊ विमानांना इंधनासाठी वारंवार विमानवाहू युद्धनौकांवर लँडिंग करावे लागते.
दुर्घटना कमी होणार
विमानवाहू युद्धनौकांवरून उड्डाण करणे आणि लँडिंग करणे अत्यंत जोखिमीचे असल्याचे मानले जाते. अशा स्थितीत ड्रोनच्या मदतीने आता आकाशातच विमानांना इंधन पुरविले जाणार आहे. यामुळे अमेरिकेच्या नौदलाच्या एफए 18 सुपर हॉर्नेट ताफ्याला मजबुती मिळण्याची अपेक्षा आहे. वारंवार उड्डाण आणि लँडिंग करण्यापासून वाचल्याने लढाऊ विमानांच्या दुर्घटना होण्याची शक्यताही कमी होणार आहे.









