प्रतिनिधी / बेळगाव
शहर आणि उपनगरांतील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आले आहे. मात्र काँक्रिटीकरण करताना ड्रेनेज चेंबरचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे क्लोजडाऊन असल्याने डेनेज चेंबरची उंची वाढवून नवीन चेंबर बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. कॉलेज रोडसह विविध ठिकाणी काम करण्यात येत आहे.
सध्या शहरात क्लोजडाऊन असल्याने वाहतूक रहदारी बंद आहे. विशेषतः अवजड वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली आहे. तर शहरात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून अन्य व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील वर्दळ बंद आहे. काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवरील डेनेज चेंबरची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. शहर आणि उपनगरांतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. पण रस्त्यांवर असलेल्या डेनेज चेंबरची उंची वाढविण्यात आली नव्हती. तसेच नव्याने डेनेज चेंबरचे बांधकाम करण्यात आले नव्हते. त्यामुळे ड्रेनेज चेंबर तुंबल्यास सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचण होण्याची शक्मयता आहे. सध्या कोरोनाचा प्रसार झाल्याने क्लोजडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक वर्दळ कमी असल्याने सर्व ठिकाणांच्या डेनेज चेंबरची खोदाई करून नव्याने बांधकाम करून उंची वाढविण्यात येत आहे. सदर काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. गुरुवारी कॉलेज रोड परिसरातील डेनेज चेंबर बांधण्याचे काम करण्यात आले.









