बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरच्या सेंट्रल क्राइम ब्रँचने (सीसीबी) कन्नड फिल्म इंडस्ट्रीत अंमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात चौकशी सुरु असून मंगळवारी अभिनेता दिगंथ मंचले आणि ऐंद्रिता रे यांना बुधवारी सीसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील त्यांनी दिगंथ आणि ऐंद्रिता रे यांना आज सकाळी केंद्रीय गुन्हे शाखेत (सीसीबी) हजर होण्यास नोटीस बजावली होती असे सांगितले
सीसीबीच्या माहितीनुसार यासंदर्भात आतापर्यंत १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून कन्नड चित्रपटाची अभिनेत्री रागिनी द्विवेदी आणि संजना गलराणी यांच्यासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.









