बेंगळूर/प्रतिनिधी
शहर पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेकडून कन्नड चित्रपट सृष्टीतील ड्रग तस्कर आणि सेवन प्रकरणाची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी कन्नड अभिनेत्रींनसह त्यांच्या संबंधितांवर कारवाई केली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी विनय कुमार याला अटक करण्यात आली आहे. विनय सप्टेंबरपासून फरार होता.
सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली व नंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. कॉटनपेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपी विनय कुमार याला अटक करण्यात आली आहे. कोर्टाने त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, याप्रकरणी तपास करीत असलेल्या सीसीबीच्या आरोपानुसार विनयला अटक करण्यात आली आहे. कुणीगळ येथील एका खाणीचा मालक म्हणून ओळखला जाणारा आरोपी सराफ व्यापारी वैभव जैन याच्याशी संबंधित आहे.









