बेंगळूर/प्रतिनिधी
बुधवारी सँडलवुड ड्रग तस्कर प्रकरणी कन्नड अभिनेता दिगंथ मंचले याची बुधवारी दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. सीसीबीच्या आरोपानुसार त्याने संशयित आफ्रिकन ड्रग तस्कराशी देवाणघेवाण करणारे काही संदेश मोबाईल मधून काढून टाकल्याचे आढळून आले.
१६ सप्टेंबर रोजी पत्नी आंद्रित रे यांच्यासमवेत पहिल्यांदा चौकशी करण्यात आली होती. गरज वाटल्यास सीसीबीने त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल असे म्हंटले होते. त्याच प्रमाणे दिगंथ ला सीसीबी पोलिसांनी बुधवारी पुन्हा फोन करून चौकशीसाठी बोलवले. सकाळी ११.२० च्या सुमारास तो सीसीबी पोलीस अधिकाऱ्यांसमोर हजर झाला.
सीसीबीने ड्रग्ज याप्रकरणी सीसीबीने कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदी, संजना गलराणी, पार्टी संयोजक वीरेन खन्ना आणि काही इतरांना अटक केली आहे.