- एनसीबीच्या अधिकाऱ्यांना घाबरवण्यासाठी आरोपीने त्यांच्यावर सोडले कुत्रे
ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मुंबईच्या उपनगरी भागातील ग्राहकांना ड्रग्ज पुरवणाऱ्या विद्यार्थ्याला एनसीबीने अटक केली. विद्यार्थ्याला बेड्या ठोकण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घाबरवण्यासाठी बिलंदर आरोपीने त्यांच्यावर कुत्रे सोडले.

- लॉकडाऊनमुळे बनला ड्रग्ज पेडलर
मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने कॉलेज विद्यार्थ्याला ड्रग्ज पुरवण्याच्या आरोपाखाली अटक केली. मुंबईच्या वांद्रे भागात त्याच्या घरी छापा टाकून कारवाई केली. हा विद्यार्थी बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मुंबईच्या उपनगरी भागात राहणाऱ्या लोकांना ड्रग्ज पुरवठा करत होता. लॉकडाऊनच्या काळात आरोपीने ड्रग्ज विकण्याला सुरुवात केली होती. कमी वेळेमध्ये जास्त पैसे मिळू लागल्यामुळे आरोपीला ड्रग्स सप्लायची चटक लागली आणि तो यामध्ये अजून सक्रिय झाला.
दरम्यान, आरोपीला अटक करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा अधिकाऱ्यांना घाबरवण्यासाठी आणि कारवाई रोखण्यासाठी आरोपीने नसता आगाऊपणा दाखवला. विभागीय संचालक यांच्या पथकावर कुत्रे सोडले. तरीही न घाबरता एनसीबीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
या कारवाईमध्ये एनसीबी अधिकाऱ्याने अयानकडून गांजा जप्त केला आहे. जो त्याने त्याच्या कॉम्प्युटरच्या सीपीयूमध्ये लपवला होता. तसेच 2 लाख 30 हजार रुपयांची रोकडही जप्त केली. तसेच एनसीबी अधिकाऱ्यांनी अयानकडून कॉम्प्युटर, मोबाईल, इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि ड्रग्स वजन करण्यासाठी वापरण्यात येणारा वजन काटा ही जप्त केला आहे.








