बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक हायकोर्टाने शुक्रवारी सँडलवूड ड्रग्स प्रकरणात अटकेत असणारी कन्नड चित्रपट अभिनेत्री संजना गलराणी हिला सशर्त जामीन मंजूर केला.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, गलराणी हिला दोन जामीनदारांसह ३ लाख रुपयांच्या वैयक्तिक बाँडच्या अंमलबजावणीच्या अधीन तिला जामिनावर सोडण्यात येईल. दरम्यान तिला दरमहा दोनदा उपस्थिती दर्शविण्याचे आणि तपासणीस सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीस, गलराणी हिला वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळण्यासाठी नवीन याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने सोमवारी संजनाची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. आदेश देताना न्यायमूर्ती श्रीनिवास हरीश कुमार यांनी वणी विलास रुग्णालयात संजनाच्याच्या वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनीही गुरुवारी अहवाल सादर करण्यास सांगितले होते.









