ऑनलाईन टीम / मुंबई :
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह 6 लोकांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात रिया चक्रवर्तीने एनसीबी समोर ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींची नावे घेतली आहेत. शौविक आणि रियाच्या व्हाॅट्सॲप चॅटमधून देखील याबाबत माहिती मिळाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार रियाने बी टाऊन मधील 25 कलाकारांच्या नावाची यादी एनसीबीला दिली आहे.
यामध्ये अभिनेता सैफ अली खान यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा ही नावे रियाने यादीमध्ये घेतली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता एनसीबीच्या रडारवर बी टाऊन मधील 25 नावे आहेत. ज्यांना चौकशीसाठी एनसीबी बोलवण्याच्या तयारीत आहे.
याच माहितीच्या आधारे आज एनसीबी मुंबई गोव्यामध्ये छापे टाकत आहे. तर शौविकने ड्रग्जसाठी रिया कधी कधी आपल्या अकाउंट मधून पैसे देत असल्याची कबुली दिली तर सॅम्युअलने सुद्धा या माहितीला दुजोरा देत रियाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. सॅम्युअल आणि शौविक दोघांनीही रिया ही सुशांतसाठी ड्रग्ज मागवत असल्याची कबूली दिली आहे. तसेच दोघांनी सुशांतच्या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर व्हायचा आणि कोण कोण त्याचे सेवन करायचे याचीही माहिती दिली आहे.
माहितीनुसार सारा अली खानचे नाव थायलंडच्या एका टूरमध्ये समोर आले आहे. ती सुशांतसोबत तिकडे गेली होती. तर डिझायनर सिमोन खंबाटाचे नाव रियाच्या व्हॉट्सएप चॅटमधून ड्रग्ज प्रकरणात समोर आले. तर रियानं एनसीबी चौकशीदरम्यान रकुलप्रीतचं नाव घेतलं होतं.









