बेळगाव प्रतिनिधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱयामुळे भारताची आर्थिक प्रगती नसून अधिक नुकसान होणार आहे .तसेच अमेरिकेशी होणाऱया आर्थिक करारामुळे देशातील शेतकऱयांना फटका बसेल असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पक्षाचे राष्ट्रीय सचिव सीताराम येचुरी यांनी दिला आहे .
मंगळवारी बेळगावात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता यासंदर्भात आपले विचार मांडले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱयाचे मोठे स्तोम माजवले जात आहे. मात्र नरेंद्र मोदी यांनी भारतातील व्यापार-व्यवसाय संदर्भात अमेरिकेशी करार करण्यासाठीत्यांना निमंत्रित केले आहे ही मोठी चुकीची बाब आहे.अमेरिकेला अधिक श्रीमंत करण्याचा आणि भारताला अधिक गरीब करण्याचा हा प्रकार हास्यास्पद आहे असे मत त्यांनी मांडले
नव्याने जनगणना मोहीम आता लवकरच सुरू होणार आहे. तत्पूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दिनांक 1 मार्चपासून घरोघरी जाऊन नागरिकत्व कायद्याच्या त्रुटी संदर्भात जागृती मोहीम सुरू करण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी योग्य रीतीने झाल्यास नव्या कायदा दुरुस्तीची गरज भासणार नाही यासाठी ही जागृती मोहीम असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
नागरिकत्व सुधारणा कायदा हा अमलात आणण्यासाठी
मोदी सरकारने उचललेली पावले चुकीचे आहेत यासाठी यापूर्वी असणारे कायदे योग्यरीतीने
अमंलबजावणी करण्यात आलेले अपयश लपविण्यासाठी मोदी सरकार हा नवीन प्रयोग करत आहे. त्याची
काही गरज नाही. त्याचप्रमाणे या मुद्यावर उद्भवलेल्या परिस्थितीला संपूर्णतया केंद्र
सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या बेळगाव शाखेचे
पदाधिकारी उपस्थित होते.









