ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी दुसऱ्यांदा निगेटिव्ह आली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
मागील महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडामधील एका रिसॉर्टमध्ये ब्राझिलचे राष्ट्रपती जेर बोलसोनारो आणि त्यांचे प्रेस सेक्रेटरी फॅबियो वाजेनगार्टन यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ब्राझिलला गेल्यावरफॅबिओ वाजेनगार्टन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर राष्ट्रपती जेर बोलसोनारी यांनी चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना चाचणी करून घेतली होती. तेव्हा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यांनतर पुन्हा एकदा ट्रम्प यांनी कोरोना टेस्ट करून घेतली. त्यामध्ये दुसऱ्यांदा ट्रम्प यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.