ऑनलाईन टीम / मुंबई:
कार्डेलिया क्रूझवर झालेल्या कारवाईनंतर केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईत अनेक ठिकाणी छापासत्र सुरू ठेवले आहे. आज मुंबईतील डोंगरी भागात टाकलेल्या छाप्यात एनसीबीने दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत जवळपास 15 कोटी रुपये आहे.
मंगळवार रात्रीपासून एनसीबीकडून वांदे, जुहू आणि गोरेगाव परिसरात ठिकठिकाणी छापे घालण्यात येत आहेत. आज सकाळी पवई येथेही धाड टाकून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अंकित कुमार असे पवईमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याकडूनही अमलीपदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत.









