प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या काळात जुगारी अड्डे उदंड झाले होते. कोणी पैसे कमावण्यासाठी तर आणखी कोणी टाईमपाससाठी म्हणून जुगार खेळत होते. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शहर व तालुक्मयात मटका व्यवसाय जोरात सुरू झाला आहे. न्यू वंटमुरी येथील डोंगरावर अड्डा थाटणाऱया एका मटकाबुकीला अटक करण्यात आली आहे.
काकतीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱयांनी न्यू वंटमुरी येथील डोंगरावर सुरू असलेल्या मटका अड्डय़ावर छापा टाकून ही कारवाई केली आहे. हजरतअली आप्पासाब मुलतानी (वय 22, रा. काकती) असे पोलिसांनी अटक केलेल्या मटकाबुकीचे नाव आहे.
त्याच्यावर कर्नाटक पोलीस कायदा 78(3) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्याच्याजवळून 1 हजार 50 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी छापा टाकताच आप्पासाबचे काही साथीदार तेथून पळून गेले. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत..









