मृत धोंडीराम पाटील यांचे कुटुंबीय आणि सर्व पक्षीय कृति समितीचे बेमुदत उपोषण
प्रतिनिधी / इस्लामपूर
डॉ. सचिन सांगरुळकर संचलित लक्ष्मी-नारायण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कोविड-१९ सेंटर येथे दि.०२ मे रोजी ऑक्सिजन अभावी व चुकीची उपचार पध्दती तसेच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू पावलेल्यांना न्याय मिळण्यासाठी डॉ. सचिन सांगरुळकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी सर्व पक्षीय कृती समिती तर्फे करण्यात आली आहे.
या मागणीसाठी मृत धोंडीराम पाटील यांचे कुटुंबीय आणि सर्व पक्षीय कृती समिती यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तसेच या गैरकृत्यास पाठीशी घालणाऱ्या जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यावरही कारवाई करण्याची ही मागणी कृती समितीने केली आहे.








