प्रतिनिधी/पुणे
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांनाअसोसिएशन ऑफ इंडिया – कम्युनिकेशन मल्टिमीडिया अँड इन्फ्रास्ट्रक्चर (सी एम ए आय) यांच्या वतीने सोळाव्या राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार कार्यक्रमात एक्सलंट कॉन्ट्रीब्युशन टू एज्युकेशन सेक्टर हा गौरव देण्यात आला.प्रदीर्घ व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक योगदानासाठी एक्सलंट कॉन्ट्रीब्युशन टू एज्युकेशन सेक्टर या पुरस्काराने गौरविण्यात येते.
भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या समवेत शिक्षण क्षेत्रात पंचेचाळीस वर्षे केलेल्या कामाची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला याचा मनस्वी आनंद आहे. या वाटचालीत लहान मोठ्या सर्व घटकांचे मला सहकार्य लाभले अशी भावना डॉ. शिवाजीराव कदम यांनी समारंभात व्यक्त केली. दरम्यान पुरस्काराबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि राज्याचे कृषी व सहकार राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Previous Articleदिल्ली : 19,832 नवे कोरोना रुग्ण; 19,085 रूग्णांना डिस्चार्ज!
Next Article एन. रंगास्वामी चौथ्यांदा पुदुचेरीचे मुख्यमंत्री








