समाजसेवक श्री अण्णा हजारे यांचे शुभ हस्ते प्रदान
प्रतिनिधी/ सातारा
राळेगण सिद्धी – इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्डस् तर्फे “सर्वात मोठी रांगोळी’’ “सर्वात मोठे शुभेच्छा पत्र’’, “सर्वात मोठे वर्तमानपत्र’’, “सर्वात मोठी पतंग’’, “सर्वात मोठे पोस्ट कार्ड’’, “सर्वात मोठे अंतर्देशीय पत्र’’, “सर्वात मोठे पॅम्प्लेट’’, “सर्वात मोठी ट्रॉफी’’, “सर्वात मोठे पुस्तक’’, “सर्वात मोठा वेडिंग बुके’’ “ सर्वात मोठे फुलांचे शिवलिंग’’, सर्वात छोटी राखी’’, “सर्वात छोटे कमळ’’, “सर्वात छोटे बॅडमिंटन रॅकेट’’, “सर्वात मोठा गुलाबांचा गुच्छ’’ या सारखे 174 विश्वविक्रम करून भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार करणारे 174 विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ दीपक हारके यांना “इंडियन स्टार रिपब्लिक अवॉर्ड 2020’’ प्रदान करून गौरविण्यात आले.
राळेगण सिद्धी येथे समाजसेवक श्री अण्णा हजारे यांचे शुभ हस्ते डॉ दीपक हारके यांना “इंडियन स्टार रिपब्लिक अवॉर्ड 2020’’ प्रदान करण्यात आला.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ दीपक हारके यांना गेल्या 30 वर्षांपासून वेगवेगळ्या विश्वविक्रमी उपक्रमातून भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार करून 174 विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय बनल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.









