प्रतिनिधी / जयसिंगपूर
चैतन्य शिक्षण समूहाचे संस्थापक डॉ. दशरथ गणपतराव काळे आणि जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष मिलिंद कृष्णाजी शिंदे यांनी कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण सेन्सॉर बोर्डावरवर सदस्य पदी निवड झाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावाने आणि आदेशाने सांस्कृतिक खात्याचे उपसचिव विलास थोरात यांनी हा निर्णय बुधवारी जाहीर केला.
शासनाच्या वैधानिक पदावर पश्चिम महाराष्ट्रातून पहिल्यांदाच दोघांना संधी मिळाली असून सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विशेष शिफारशी नंतर राज्याचे सांस्कृतिक मंत्री नामदार अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे, आरोग्यराज्यमंत्री आज सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री नामदार डॉ राजेंद्र पाटील ( यड्रावकर ) यांनी याबाबत विशेष प्रयत्न करून आपल्या दोन्ही शिलेदारांच्या गळ्यात ही माळ घातली आहे.
डॉ. दशरथ काळे व मिलिंद शिंदे यांनी साहित्य कला व सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्ष काम केले असून, महाविद्यालयीन काळापासून त्यांनी एकांकिका, नाट्यस्पर्धा, संगीत कला व गायन क्षेत्रात मोठे काम केले आहे, आपापल्या कार्यक्षेत्रात अनेक स्पर्धांचे नेटके आयोजन करून श्री. काळे व शिंदे यांनी अनेक नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, एकूणच यांच्या या कामगिरीची दखल घेऊन शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यपदी यांना संधी प्राप्त झाली आहे,