प्रतिनिधी /पणजी
समाज कल्याण संचालनालयाने 60 वर्षावरील आणि गोव्यातील अनुसूचित जातीतील लोकांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी किमान 25 वर्षे सेवा बजाविलेल्या व्यक्तींकडून डॉ. आंबेडकर सामाजिक पुरस्कारासाठी अर्ज मागविले आहेत. रोख 25 हजार रूपये, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या योजनेचा उद्देश सामाजिक जागरूकता निर्माण करणाऱया व्यक्तींना प्रोत्साहित करणे आणि समाजाला, सर्वसाधारणपणे, अनुसूचित जातींच्या उन्नतीसाठी आणि कल्याणासाठी कार्य करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. 14 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी हे पुरस्कार देण्यात येईल.
इच्छुक व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्जांसाठी समाज कल्याण संचालनालय, फार्मासिया सासष्टी समोर, 18 जून मार्ग येथे संपर्क साधावा. पूर्ण भरलेले अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 अशी आहे.








