ऑनलाइन टीम / पुणे :
महाराष्ट्र ब्राह्मण सभा पुणे संस्थेच्या ९४ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉ.अमोल सप्तर्षी, मकरंद टिल्लू, शिरीष कर्णिक, सुप्रिया लोखंडे, आर्या बेरी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक ११ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता पौड रस्त्यावरील पुण्याई सभागृहात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र ब्राह्मण सभा पुणे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ढेपे वाडयाचे नितीन ढेपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे. शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि रुपये ५ हजार असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदाचा धन्वंतरी पुरस्कार डॉ.अमोल सप्तर्षी, कला पुरस्कार मकरंद टिल्लू, उद्योजक पुरस्कार शिरीष कर्णिक, सामाजिक पुरस्कार सुप्रिया लोखंडे, खेळाडू पुरस्कार आर्या बेरी यांना प्रदान करण्यात येणार आहे.









