नवी दिल्ली
कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली अल्पशी घट झाल्याच्या कारणास्तव रुपया सुरुवातीच्या व्यवहारामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 20 पैसे वधारुन 76.73 वर पोहचला आहे. विदेशी चलन व्यावसायीकांच्या मते येणाऱया काळात रुपयामध्ये तेजी राहणार आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाची जोखीम घेण्याची इच्छा बाजाराने कमी दर्शविली आहे. विदेशी चलन विनिमय बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये सकाळी 77.02 वर खुला झाला होता.









