मुंबई
देशातील बाजारात मोठय़ा प्रमाणात झालेल्या खरेदीमुळे गुंतवणूकदारांच्या भावाना मजबूत झाल्याच्या पहावयास मिळाले आहे. यामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत शुक्रवारी रुपया 18 पैशांनी मजबूत होत 74.84 पातळीवर बंद झाला आहे. अंतर बँक विदेशी मुद्रा बाजारामध्ये देशातील मुद्रा 74.84 वर झाला असून जो मागील बंद भाव 75.02 च्या तुलनेत 18 पैशांनी तेजी प्राप्त केली आहे. दिवसभरातील कामगिरीत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 74.84 चा उच्चांक आणि 74.96 चा निचांक प्राप्त केल्याची नोंद करण्यात आली आहे. शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीमधील नरमाईने रुपयाचे समर्थन केल्याचे शुक्रवारी पहावयास मिळाले आहे.









