बेळगाव : सरस्वतीनगर, गणेशपूर येथील एका डॉक्टर महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
डॉ. भारती उपेंद्र यलगुद्री (वय 47) असे त्या महिलेचे नाव आहे. डॉ. भारती या येथील एका खासगी इस्पितळात सेवा बजावत होत्या. कौटुंबिक वादातून मंगळवारी सकाळी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस येताच दोरी कापून कुटुंबीयांनी त्यांना खासगी इस्पितळात हलविले.
उपचाराचा उपयोग न होता मध्यरात्रीनंतर डॉ. भारती यांचा मृत्यू झाला. कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी पुढील तपास करीत आहेत.









