ऑनलाईन टीम / पुणे :
लॉकडाऊनच्या काळात ठिकठिकाणी काही दुकाने व व्यवहार सुरु झाले असले, तरी देखील अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु केलेले नाहीत. छोटया-मोठया आजारांसाठी व दैनंदिन तपासणीसाठी रुग्णांना मोठया रुग्णालयात जावे लागत आहे, त्यामुळे खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरु करावे, याकरीता पुण्यातील गणेश मंडळाने पुढाकार घेतला आहे.
दवाखान्यात आल्यावर कोणाचाही स्पर्श न होता, स्टँडवरील सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची सोय 15 दवाखाने व पोलीस स्टेशनमध्ये देखील मंडळाने करुन दिली आहे.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे 11 स्टँड खासगी डॉक्टर्स व 4 स्टँड पोलीस स्टेशनला देण्यात आले. यासोबत 5 लीटरचा सॅनिटायझरचा कॅन देखील देण्यात आला.
डॉ. राजेश दोशी म्हणाले, गणेशोत्सव मंडळाने अशी मदत देणे हे कौतुकास्पद आहे. डॉक्टरांनी दवाखाने उघडण्याकरीता दिलेली ही मदत उपयुक्त आहे. सॅनिटायझरच्या बाटलीला हात न लावता पॅडलद्वारे सॅनिटायझर घेणे यामुळे शक्य आहे. त्यामुळे ही साथ पसरण्यास प्रतिबंध देखील घालता येणार आहे.