शनिवारी 253 जणांना बाधा, 272 जण झाले कोरोनामुक्त, 8 जण दगावले
प्रतिनिधी /बेळगाव
सरकारी डॉक्टरांच्या मागण्या मान्य करण्याचे सरकारने ठरविल्यानंतर डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे शनिवारपासून कोरोना रुग्णांची नोंद करुन यादी बनविण्याचे पूर्ववत सुरु झाले आहे. शनिवारी दिवसभरात 253 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱया रुग्णांची संख्या अधिक आहे. 253 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 272 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बेळगाव तालुक्मयातील 72 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहर वउपनगरातील 41 व ग्रामीण भागातील 31 जणांचा यामध्ये समावेश आहे.
गेल्या 24 तासांत तीन महिलांसह 8 जण दगावले आहेत. इंगळी, हुक्केरी, संपगाव, नागरमुनवळी, मारिहाळ, चिकोडी, गोकाक, बेळगाव येथील बाधितांचा मृतांमध्ये समावेश आहे. मृतांचा सरकारी आकडा 262 वर पोहोचला आहे. तर बाधितांचा आकडा 17 हजार 675 वर पोहोचला आहे.
आतापर्यंत 15 हजार 103 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 2 हजार 310 जण सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 1 लाख 31 हजार 490 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. यापैकी 1 लाख 12 हजार 394 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
बाळगमट्टी, कंग्राळी बी.के., शिंदोळी, काकती, राजहंसगड, कंग्राळी के. एच., हिरेबागेवाडी, खासबाग, कॅम्प, संगमेश्वरनगर, शांतीनगर, शहापूर, नेहरुनगर, श्रीनगर, टिळकवाडी, विद्यानगर-अनगोळ, कुवेंपूनगर, मराठा कॉलनी, शाहूनगर, अशोकनगर, काळी आमराई, हनुमाननगर, माळमारुती, राणी चन्नम्मानगर, शुक्रवारपेठ-टिळकवाडी, शिवबसवनगर, वडगाव परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
सांबरा एटीएसमधील आणखी 21 जणांना बाधा सांबरा येथील एअरफोर्स ट्रेनिंग सेंटरमधील आणखी 21 जणांचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. आयटीबीपीमधील एका जवानालाही कोरोनाची लागण झाली असून बिम्स्मधील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. बिम्स्मध्ये मृतांचा आकडा वाढत चालला आ









